Mon, Sep 16, 2019 12:28होमपेज › Sangli › ‘भाजप सरकारचा शेवट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

‘भाजप सरकारचा शेवट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : वार्ताहर

भाजप सरकारचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत. एकीकडे महागाईचा आगडोंब सुरू आहे; तर दुसरीकडे शेतीमालाचे भाव मुद्दाम ? पाडले जात आहेत. त्यामुळे या सरकारबद्दल जनतेत प्रचंड असंतोष आहे. सामान्य जनतेचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या या सरकारचा शेवट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी दिला.संपूर्ण कर्जमाफी
घेतल्याशिवाय नागपूर अधिवेशनातून परत येणार नाही, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या हल्‍लाबोल मार्चाच्या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, सभापती सचिन हुलवान, माजी सभापती रविंद्र बर्डे, माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, सुभाष सूर्यवंशी, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, विष्णुपंत शिंदे, बी.के.पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्‍वासन पाळलेले नाही. त्यामुळे या सरकारच्या धोरणाविषयी शंका उपस्थित होत आहे.भारनियमन असूनही वीज दरवाढ केली आहे. राज्यात एकही नवा उद्योग आलेला नाही. त्यामुळे बेरोजगारीही वाढली आहे. आज कोंबडीपेक्षा अंडे महाग झाले आहे.नोटाबंदीच्या काळात या सरकारने टाटा, बिर्ला, अंबानींना नव्या नोटा घरपोच केल्या. भ्रष्ट मार्गाने निघालेले हे सरकार जनतेच्या हिताचे नाही.

डांगे म्हणाले, या सरकारने शेतकर्‍यांची वाट लावून सर्व घटकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. हे सरकार राज्य करण्याच्या लायकीचे नाही. त्यामुळे धक्के देऊन ते खाली खेचले पाहिजे. मेक इन इंडियाची भाषा करणार्‍या या सरकारच्या काळात पश्‍चिम महाराष्ट्रातील 36 सूतगिरण्या बंद पडल्या. तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा  छायाताई पाटील, तालुकाध्यक्षा सुश्मिता जाधव, युवकचे संग्रामसिंह पाटील, सभापती सचिन हुलवान, रोझा किणीकर, ब्रम्हानंद पाटील, विशाल सूर्यवंशी, पूनम सावंत, जुबेर खाटीक, प्रज्ञा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.