Fri, Jul 10, 2020 16:43होमपेज › Sangli › आबांचा पराभव करण्यासाठी मोदी आले होते; पण...

आबांचा पराभव करण्यासाठी मोदी आले होते; पण...

Published On: Apr 06 2018 12:16PM | Last Updated: Apr 06 2018 12:16PMतासगाव : पुढारी ऑनलाईन 

तासगांव कवठेमहांकाळ मतदारसंघातील सामान्य जनतेची नाळ आर.आर. आबांच्या विचारांशी जोडलेली आहे. या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आर. आर. आबांनी केला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी केले. तासगाव येथील आयोजित राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्वच नेत्यांनी आबांच्या प्रतिलेमा अभिवादन करून भाजप सरकारवर हल्लाबोल केला. 

आबांचा पराभव करण्यासाठी येथे मोदी आले होते. पण त्याचा तीळमात्र फरक पडला नाही. आबा प्रचंड मताधिक्याने जिंकले. लोकांनी काळजी करू नये. आता या सरकारचा जास्त काळ उरलेला नाही. बदलाचे वारे आता वाहू लागले असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. तासगाव येथे आबांच्या गावात झालेल्या या कार्यक्रमाला आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. 

सत्ताधारी सरकार निवडणुका आल्या की पाणीयोजना सुरु करते आणि निवडणुका झाल्या की पाणी बंद करते. पाणीयोजना बाबतीत सत्ताधाऱ्यांची उदासीनता शेतकऱ्यांना अडचणीत आणल जातय. एकीकडे शेतकऱ्यांवर कोडींत पकडले जातेय तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी पोलिसांना हात लावण्याचा प्रकार घडतो आहे. तासगांव मध्ये पोलिसही सुरक्षित नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

आबा असते तर हे सरकार कधीच गेले असते : मुंडे

तासगावमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसाला मारहाण केली. ही मस्ती आम्हाला दाखवू नका, आम्ही सुसंस्कृत राजकारण करतो, म्हणून शांत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दादागिरीला घाबरणार नाही. आज जर आबा असते तर हे सरकार कधीच गेले असते, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले. 
 

Tags : Jayant Patil, Dhananjay Munde, NCP, BJP, Ajit Pawar