Thu, Feb 20, 2020 08:24होमपेज › Sangli › महिलेचा विनयभंग; एकास अटक : २४ तासात आरोपपत्र

महिलेचा विनयभंग; एकास अटक : २४ तासात आरोपपत्र

Published On: Mar 03 2018 1:44AM | Last Updated: Mar 03 2018 12:15AMमिरज : शहर प्रतिनिधी

म्हैसाळ (ता. मिरज) येथील एका महिलेची  छेड काढत विनयभंग करून महिलेस ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दीपक आनंदा आवळे (वय 25 रा. म्हैसाळ ता.मिरज) याला अटक करण्यात आली. 
तपास पूर्ण करुन 24 तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांनी दिली.

ते म्हणाले, पीडित महिलेने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा प्रकार गुरुवारी घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ह्या गुन्हाचा 24 तासात तपास करून संशयित दीपक  आवळे याला अटक करुन तपास पूर्ण करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात  आले