मिरज : जे. ए. पाटील
पेठ-सांगली-मिरज हा राज्य मार्ग आता राष्ट्रीय महामार्गाकडे (क्र. 166 एच) वर्ग करण्यात आला आहे. हा रस्ता सध्या मिरज ते भारती हॉस्पिटलपर्यंत चारपदरी, तर भारती हॉस्पिटल ते कर्मवीर चौकापर्यंत सहापदरी करण्यात आला आहे. मात्र, मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील कृपामयीजवळील रेल्वेपुलाजवळील रस्ता मात्र दोनपदरी आहे. पूल मोडकळीस आला आहे.
यापूर्वी पेठ-सांगली-मिरज ते म्हैसाळपर्यंतचा रस्ता राज्यमार्ग होता. या मार्गावर मिरजेत कृपामयीजवळ मिरज-पुणे रेल्वे मार्गावर मिरज-सांगली दरम्यान पूल बांधण्यात आला आहे. हा पूल जुना असून कठडे मोडकळीस आले आहेत. या ठिकाणी अनेकवेळा रस्ता खचण्याचेही प्रकार घडले आहेत.
येथे चारपदरी पुलाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वेकडे दिला होता.राज्य सरकार आणि रेल्वे यांच्याकडून प्रत्येकी 50 टक्के निधीतून चारपदरी पूल उभारण्याचा हा प्रस्ताव होता. परंतु रेल्वेकडून प्रतिसाद न मिळाला नाही.राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून मिरज ते भारती हॉस्पिटलपर्यंत चारपदरी आणि भारती हॉस्पिटल ते कर्मवीर चौक (सांगली) पर्यंत सहापदरी रस्ता केला आहे. परंतु कृपामयीजवळ रेल्वेपूल मात्र अरूंद दोनपदरीच राहिला आहे.
पंधरा दिवसापूर्वी पेठ-सांगली-मिरज-म्हैसाळ या राज्यमार्गापैकी पेठ-सांगली-मिरज (गांधीचौक) हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग (क्र. 166 एच) करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आता रेल्वे पुलासाठी प्रयत्न होणार नाहीत. राष्ट्रीय महामार्गामुळे रेल्वे आणि केंद्रीय रस्ते विकास महामंडळ यांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. हा पूल तातडीने रुंद करण्याची गरज आहे.
Tags : Sangli, Sangli News, Miraj, Sangli, Peth, road, national highway
May 06 2018 1:10AM
May 06 2018 1:10AM
May 06 2018 1:10AM
May 06 2018 1:10AM
May 06 2018 1:10AM
May 06 2018 1:10AM