Fri, Dec 13, 2019 06:07होमपेज › Sangli › मिरजेतून रेल्वेने मांसाची तस्करी 

मिरजेतून रेल्वेने मांसाची तस्करी 

Published On: Apr 24 2018 8:09PM | Last Updated: Apr 24 2018 8:05PMमिरज : प्रतिनिधी 

मिरज रेल्वे स्थानकात सुमारे ३० हजार रुपये किंमतीचे मोठ्या जनावराचे मांस रेल्वे पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरचे मांस कोल्हापूर - मनगूर एक्स्प्रेसने हैद्राबादकडे पाठवन्यायासाठी तीन मोठ्या गठवड्यातून रेल्वे स्थानकात आणण्यात आले होते. रेल्वे गाडीतून बेकायदेशीरपणे मोठ्या जनावरांच्या मांसाची तस्करी होत असल्याची तक्रार पीपल्स फॉर अॅनिमल संघटनेकडून करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मांसाची तस्करी करणाऱ्या विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. 

सदर मांसाची पशु वैद्यकीय अधिकार्‍याकडून चौकशी करण्यात आल्यानंतर संशयितावर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पवार यांनी सांगितले.

Tags :sangali, sangali news, miraj, railway, meat smuggiling