Mon, Dec 17, 2018 03:06होमपेज › Sangli › बाजार समितीचे संचालक इस्लामपुरात अपघातात ठार

बाजार समितीचे संचालक इस्लामपुरात अपघातात ठार

Published On: Oct 12 2018 1:02AM | Last Updated: Oct 12 2018 1:02AMइस्लामपूर : शहर वार्ताहर

इस्लामपूर-बहे मार्गावर एमआयडीसीतील रस्त्यालगत स्कूल बस आणि मोटारसायकलची समोरासमोर  धडक होऊन   इस्लामपूर बाजार समितीचे  संचालक माणिकराव रंगराव गायकवाड (वय 58, रा. महादेवनगर, इस्लामपूर) हे जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी झाला. अपघातानंतर बसचालकाने पलायन केले. 

गायकवाड  मोटारसायकल (एम.एच.10/बीजे-2805) वरून एमआयडीसीमधून घरी येत होते. इस्लामपूरकडून भरधाव वेगात स्कूल बस येत होती. मोटारसायकल व स्कूलबस यांची जोरदार धडक झाली. या धडकेत गायकवाड  50 ते 60 फूट अंतर  मोटारसायकलसह फरफटत गेले.  गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.