होमपेज › Sangli › सुधीर गाडगीळ उद्या शक्‍तिप्रदर्शनाने अर्ज भरणार

सुधीर गाडगीळ उद्या शक्‍तिप्रदर्शनाने अर्ज भरणार

Published On: Oct 02 2019 1:41AM | Last Updated: Oct 02 2019 1:41AM
सांगली : प्रतिनिधी
सांगली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यासाठी गाडगीळ हे गुरुवारी (दि. 3) शक्‍तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघातून गाडगीळ यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. पण पक्षश्रेष्ठींनी गाडगीळ यांना पाच वर्षांतील कामांची पोहोचपावती म्हणून पुन्हा उमेदवारी दिली. पक्षाकडून त्यांना मंगळवारी दुपारी एबी फॉर्मही देण्यात आला आहे. गाडगीळ आता गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

त्यासाठी महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह विविध गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ढोल-ताशांच्या निदादात शहरातून भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयात ते अर्ज दाखल करण्यासाठी जातील. अर्ज दाखल करताना मात्र कार्यालयात पाचजणच जाणार असल्याचे सांगण्यात आले.