Tue, Jul 07, 2020 20:02होमपेज › Sangli › कूडणूर खून प्रकरण पूर्ववैमनास्यातून 

कूडणूर खून प्रकरण पूर्ववैमनास्यातून 

Published On: Nov 09 2018 6:12PM | Last Updated: Nov 09 2018 6:12PMयेळवी (सांगली): वार्ताहर 

कुडणूर (ता.जत) येथील सिध्दनाथ बाबासो सरगर या तरुणांचा टॉमीने हल्ला करून खून करण्यात आला होता. ही घटना बुधवार दि.७ नोव्हेंबर रोजी कूडणूर येथील खांडेकर मळ्यानजीक घडली होती. सिध्दनाथ यांचा हा खून पूर्ववैमनास्यातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच झालेल्या या खूनाच्या घडनेने कुडणूर सह परिसरात घबराट पसराली होती. 

सिध्दनाथ सरगर हे व्यवसायाने ट्रक्टर चालक होते. त्यांचा गावातील टेम्पो चालक प्रमोद तानाजी खांडेकर यांच्याशी जूना वाद होता. सहा महिन्यापुर्वी दोघांत हाणामारीपर्यत वाद झाला होता. बुधवार दि.७ नोव्हेंबर रोजी ही त्यांच्यात वाद झाला. यामुळे सिध्दनाथवर प्रमोद चिडून होता. सिध्दनाथ दुचाकीवरून घरी जात असताना प्रमोद यांने त्यांचा टेम्पोतून पाठलाग केला. खांडेकर वस्तीनजीक त्याने सिध्दनाथच्या टेम्पो आडवा उभा केला. तर यावेळी सिध्दनाथच्या डोक्यात आपल्या जवळ असलेल्या टॉमी या शस्त्राने प्रहार केला. त्यात सिध्दनाथची डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  यावेळी घटनास्थळावरून संयशित प्रमोदने पलायन केले होते. 

जत पोलिस या घटनेचा तपास करीत असतानाच प्रमोदचा टेम्पो (एमएच-१०,झेड-४६६७) हा जत येथे आढळून आला. पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेतला असुन संशियत आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान प्रमोद शिवाय अन्य आरोपी आहेत का यांचाही पोलिस शोध घेत आहेत. याचा अधिक तपास  पोलिस फौजदार रणजित गुंडरे हे करीत आहे.