Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Sangli › कासेगाव पोलिस ठाणे स्व-इमारतीच्या प्रतीक्षेत

कासेगाव पोलिस ठाणे स्व-इमारतीच्या प्रतीक्षेत

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 1:34AMइस्लामपूर : मारूती पाटील

कासेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी मात्र गेली 37 वर्षे हक्काच्या निवार्‍यापासून वंचित आहेत. ना स्वत:च्या मालकीची इमारत... ना कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान...अशा अवस्थेत कासेगाव पोलिसांचा कारभार सुरू आहे. स्वतंत्र इमारतीची मागणी प्रलंबित आहे.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर कासेगावच्या पूर्वेस हे पोलिस ठाणे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे.  या ठाण्यांतर्गत वाळवा तालुक्यातील 12 तर शिराळा तालुक्यातील 10 अशा 22 गावांचा समावेश होतो. या पोलिस ठाण्याची स्थापना सन 1981 साली झाली आहे.  सन 1985 सालापासून इमारतीसाठी शेकडो प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले. परंतु हे प्रस्ताव रखडले आहेत. 

मार्च 2011 मध्ये पोलिस ठाण्याच्या नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानाचा सुधारित  प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही  मान्यता देवून मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे. परंतु पुढे मात्र त्याची काहीच कार्यवाही झालेली नाही. या  प्रस्तावात  गट नं. 2872 मधील 65 गुंठे जमीन पोलिस ठाण्याच्या इमारत तर शासकीय विश्रामगृहाजवळील गट नं. 2965 मधील साडेतीन एकर जमीन पोलिस कर्मचार्‍यांच्या निवासासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.ग्रामपंचायतीनेही ही जागा पोलिस ठाण्याला देण्यास काहीही हरकत नसल्याचा ठराव दिला आहे. मात्र हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पोलिस अधिकार्‍यांच्याकडून नवीन इमारत व निवासस्थानासाठी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.