होमपेज › Sangli › जयंत पाटील यांचा मोबाईल हॅक करून केला चुकीचा प्रचार

जयंत पाटीलांचा मोबाईल हॅक करून चुकीचा प्रचार

Published On: Apr 23 2019 1:37AM | Last Updated: Apr 23 2019 1:37AM
इस्लामपूर : शहर वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्या मोबाईल क्रमांकवरून सांगली लोकसभा मतदार संघात चुकीचा प्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याबाबत जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान , कार्यकर्ते व मतदारांनी या अपप्रचाराला बळी पडू नये,असे आवाहन आ.पाटील यांनी केले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोणीतरी अज्ञात व्यक्‍तीने आ. पाटील यांचा मोबाईल हॅक  त्यावरून मतदारसंघात चुकीचा संदेश दिला जात असल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून आ. पाटील यांना मिळाली. मतदार संघातील अनेक  कार्यकर्त्यांना असे फोन गेल्याचे आ. पाटील यांच्या निदर्शनास आले. आ.पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून इस्लामपूर पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधी गुन्हा दाखल केला आहे.

खोडसाळपणाचा निषेध

आ. पाटील म्हणाले, ‘फेक कॉलर अ‍ॅपवरून माझा मोबाईल क्रमांक हॅक करून हा खोडसळपणा केला आहे. मी या खोडसाळपणाचा निषेध करतो. कार्यकर्ते व मतदारांनी या खोडसाळपणावर विश्‍वास ठेवू नये’, असे आवाहन त्यांनी केले.