Mon, Jul 13, 2020 07:40होमपेज › Sangli › जत तालुक्याची जलक्रांतीच्या दिशेने वाटचाल

जत तालुक्याची जलक्रांतीच्या दिशेने वाटचाल

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 9:17PMयेळवी : विजय रुपनूर 

दुष्काळ आणि पाणी टंचाईचे कामयस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेमध्ये 106 गावांनी सहभाग घेतला आहे,हा तालुका आता जलक्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.कायम दुष्काळी असलेल्या जत तालुका पाण्यासाठी वणवण करतो. ही वस्तुस्थिती आहे. पाणीटंचाईचे चटके तालुक्यातील ग्रामस्थांना वारंवार सोसावे लागतात. दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी गावातील पाणी गावात मुरवण्यासाठी अनेक गावे सरसावली आहेत. 

श्रमदानाकरिता वयाची अट नसते, अशाच संदेश तालुक्यातील बालचमूंनी सहभागातून  दिला आहे. छोट्या वॉटरहिरोनी जलसंधारणाच्या कामातील उत्साह वाढविला.पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेस केंद्रस्थानी ठेवून  प्रत्यक्षात वाव देत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, समतल चर, मातीनाला बांध, ओढापत्रातील गाळ काढणे, नाला खोलीकरण व रुंदीकरण करणे  ही कामे यंत्राच्या सहाय्याने करीत श्रमदानास बळ दिले आहे. या कामाकरिता पाणी फौंडेशन,भारतीय जैन संघटना, नाम फौंडेशन, स्पदंन सारख्या स्वयंसेवा संस्थांनी जेसीबी व पोकलेन देऊन दुष्काळ मुक्तीकरिता पुढाकार घेतला आहे. शासनाने सहभागी गावांकरिता प्रोत्साहन म्हणून इंधन खर्चाकरिता 1 .50 रुपये देणार आहेत. यंत्रामुळे गती वाढविणचे काम केले आहे. 

ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सौ. मंगलताई जमदाडे  म्हणाल्या की, जत तालुक्यात 106 गावांनी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला असून  मृदा संधारण व जलसंधारणाच्या कामांचे नियोजन केले असून अजूनही काही ग्रामस्थ श्रमदानात सहभागी होत नसतील त्यांनी  श्रमदानात सहभागी व्हावे. सौ.जमदाडे यांनी आवंढी गावास भेट देऊन दोन तास श्रमदानही केले व ग्रामस्थांसोबत कामांविषयी चर्चाही केली. सभापतींनी लोकविधायक चळवळीत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले

जलसंधारणाच्या कामाकरिता  सक्रिय सहभागी व्हावे : मंगलताई जमदाडे

जत तालुक्याला दुष्काळमुक्त करणेकरिता जलसंधारणाच्या कामाची गरज आहे. जलसंधारणातून जलक्रांती घडविण्यासाठी सर्व एकत्र येतील, असा विश्वास जत पंचायत समिती सभापती सौ .मंगलताई जमदाडे यांनी आवंढी (ता.जत) येथे पाणी फौंडेशनच्या श्रमदानावेळी विश्वास व्यक्त केला.