इस्लामपूर : प्रतिनिधी
पलूस येथे दै. पुढारी कस्तुरी क्लब व फ्युजन डान्स अॅकॅडमी, फिटनेस मंत्रा यांच्यावतीने कस्तुरी सभासद व त्यांच्या पाल्यांसाठी डान्स व फिटनेस वर्कशॉपचे रविवारी (दि. 4) दुपारी 4 वाजता उद्घाटन होणार आहे. वर्कशॉप पाच दिवसांचे आहे.
येथील बाबुभाई पटेल कॉम्प्लेक्स पहिला मजला, धोंडी महाराज मंदिराजवळ, फ्युजन डान्स अॅकॅडमीमध्ये सकाळी 10 ते 12, सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे. सूरज वाघमोडे, सोनू वाघमारे हे डान्सचे प्रशिक्षण देणार आहेत. मुलांना शास्त्रशुद्ध फोक, वेस्टर्न डान्स, बॉलीवूड डान्सचे प्रकार शिकविले जाणार आहेत. आत्मविश्वास वाढविणे, स्टेज डेअरींग, चित्रपट क्षेत्रात संधी, अॅकॅडमीच्या रंगोत्सव कार्यक्रमात डान्स सादरीकरण, चित्रपटातील गाणी, अल्बम, रिअॅलिटी शो, स्टेज शो, कॉलेजमध्ये व्यवसायिक संधी, अनुभवी कलाकारांकडून मिळणार्या मार्गदर्शनातून चांगला कलाकार घडविणे असे त्याचे फायदे आहेत. या अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेणार्या सभासद व पाल्यांना फीमध्ये वर्षभर सवलत दिली जाणार आहे. पलूस परिसरातील कस्तुरी सभासद व पाल्यांनी त्वरित आपली नावे नोंदणी करावी. कस्तुरी संयोजिका मधु देसावळे 8830604322, इस्लामपूर कार्यालय- 02342-222333 वर संपर्क साधावा.