Thu, Jul 02, 2020 12:09होमपेज › Sangli › बेकायदा ५ गावठी पिस्तूल, १५ काडतुसे जप्त

बेकायदा ५ गावठी पिस्तूल, १५ काडतुसे जप्त

Last Updated: Oct 19 2019 1:27AM
सांगली: प्रतिनिधी
आटपाडी येथे शस्त्र तस्करी करणार्‍या दोघांकडून पाच देशी बनावटीची  पिस्तूल, १५ जिवंत काडतुसे व कार जप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. 

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी देवा उर्फ देवेंद्र तानाजी सांगवे (वय २४ रा.थेरगाव,चिंचवड, पुणे ) आणि बाला उर्फ बालाजी गणपत अदाटे, (वय २२ वर्षे,रा. बालटेनगर, दिघंची रोड, आटपाडी) यास अटक केली .  

पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पोलिस निरिक्षक श्रीकांत पिंगळे यांनी जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध्य शस्त्रे बाळगणारे इसमाची माहिती काढणे त्यांचेवर कारवाई करण्यासाठी खास पथक तयार केले आहे. हे पथक आटपाडी विभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना सांगवे व अदाटे हे दोघे गावठी बनावटीचे पिस्टल देण्यासाठी त्यांचेकडील गाडी (क्र. एम.एच.१४ एफसी ००६९) घेवून आटपाडी शहरातील नाझरे रोडने सांगोल्याकडे जाणार आहेत, अशी मागिती मिळाली. त्यानुसार आटपाडी ते नाझरे जाणारे रोडवर सापळा लावला.

सिल्व्हर रंगाची गाडी आटपाडी चौकाकडून नाझरे रोडकडे येताना दिसली. त्या गाडीचा संशय आल्याने पथकाने त्यांना गाडीसह ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता त्यांचे कब्जातील गाडीत ड्रायव्हर सिटखाली असलेल्या सॅकमध्ये ५ गावठी पिस्टल व १५ जिवंत काडतसे, ५ मॅग्झिन सापडली. त्याशिवाय कार असा एकुन ९ लाख ५४ हजार ०५० रुपये चा मद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाणे येथे  गुन्हा दाखल करणेत आला आहे.