Fri, Jul 10, 2020 02:18होमपेज › Sangli › गोपीचंद पडळकर ‘वंचित’मधून बाहेर

गोपीचंद पडळकर ‘वंचित’मधून बाहेर

Published On: Sep 27 2019 2:17AM | Last Updated: Sep 26 2019 10:22PM
सांगली : प्रतिनिधी
धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक आहे. हा प्रश्न सोडविण्याबाबत कार्यकर्त्यांचा आपल्यावर दबाव आहे. हा विचार करून आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडत असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार बैठकीत  दिली. 

ते म्हणाले,  गेल्या अनेक वर्षांपासून मी राजकारण, समाजकारण करीत आहे. धनगर आरक्षणाच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली. भाजपकडून आरक्षणाचे काम होत नाही, असे दिसल्यानंतर मी  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून सांगलीत लोकसभेची निवडणूक लढवली. 

पडळकर म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत भूमिका कोणती असावी, याबाबत मी कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहे. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे. आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबीत आहे. तरी देखील आरक्षण लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक दिसून येते.त्याअनुषंगाने विचार करून आपण वंचित आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. अन्य पक्षातून मला बोलावणे येत आहे. येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.