Mon, Dec 09, 2019 05:41होमपेज › Sangli › सांगलीत पूरबाधितांना मोफत गणेशमूर्ती, साहित्य

सांगलीत पूरबाधितांना मोफत गणेशमूर्ती, साहित्य

Published On: Sep 01 2019 1:50AM | Last Updated: Aug 31 2019 8:37PM

file photoसांगली : प्रतिनिधी

सांगलीतील महापूर बाधित कुटुंबांना गणेशोत्सवासाठी मोफत मूर्ती आणि पूजा साहित्य देण्यात येणार आहे. येथील श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने  हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. 

उपक्रमाचे संयोजन दीपक माने, चंदू घुणके, धनेश कातवाडे, सुयोग सुतार, श्रीकांत वाघमोडे, पृथ्वीराज पाटील, दरिबा बंडगर, सचिन बालनाईक, हेमंत कुलकर्णी, अमित भोसले, विशाल मोरे, गणेश पवार आदींनी केले आहे. श्रीराम प्रतिष्ठान आणि मुंबईचे आमदार प्रसाद लाड यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी शासनाच्या अनुदान मदतीची पावती घेऊन नोंदणी करावी. गणेश चतुर्थीला संबंधितांना मूर्ती व पूजेचे साहित्य देण्यात येईल.