Fri, Jul 10, 2020 02:42होमपेज › Sangli › 33 लाख रुपयांचा सुगंधी तंबाखू जप्‍त

33 लाख रुपयांचा सुगंधी तंबाखू जप्‍त

Last Updated: Nov 12 2019 11:08PM
कुपवाड : वार्ताहर
सावळी (ता. मिरज) येथील कानडवाडी रस्त्यालगत असलेल्या एका गोदामामध्ये कुपवाड पोलिसांनी छापा टाकून 33 लाखांच्या प्रभात सुगंधी तंबाखूचे 75 बॉक्स जप्त केले. यावेळी एकाला अटक केली, अशी माहिती मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संदीपसिंह गिल यांनी दिली.संशयित सर्फराज रज्जाक कच्ची (वय 35, रा. गणपती पेठ, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी बेकायदेशीर सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई करण्याचे आदेश कुपवाड पोलिसांना दिले होते. त्यानुसार कुपवाड पोलिस सुगंधी तंबाखूच्या साठ्याची चौकशी करीत होते. त्यांना माहिती मिळाली की,सावळी- कानडवाडी रस्त्यालगत असलेल्या एका गोदामामध्ये सुगंधी तंबाखूचा साठा केला जातो.

सहाय्यक निरीक्षक निरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे,हवालदार नितीन मोरे,सतीश माने,शिवाजी ठोकळ,सूरज मुजावर संदीप कोळी यांनी मंगळवारी सायंकाळी त्या गोदामावर छापा घातला.गोदामामध्ये प्रभात कंपनीच्या सुगंधी तंबाखूची 33 लाख रुपये किंमतीचे 75 बॉक्स जप्त केले. मालक सर्फराज कच्ची याला अटक केली. कच्ची याने  ही तंबाखू कोठून आणली.त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.