Mon, Jul 13, 2020 12:36होमपेज › Sangli › राजू शेट्टी हे कारखानदारांनी पोसलेले शेतकऱ्यांचे नेतृत्त्व : रघुनाथ पाटील

राजू शेट्टी हे कारखानदारांनी पोसलेले शेतकऱ्यांचे नेतृत्त्व : रघुनाथ पाटील

Published On: Dec 26 2018 5:11PM | Last Updated: Dec 26 2018 5:52PM
इस्लामपूर : पुढारी ऑनलाईन

खासदार राजू शेट्टी हे कारखानदारांनी पोसलेले शेतकऱ्यांचे नेतृत्त्व आहे. हे मी १० वर्षापूर्वीच सांगितले होते. त्याचे प्रत्यंतर आता येऊ लागले आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली.

एफआरपीचे तुकडे शेट्टींनीच केले. मागीलवर्षीची एफआरपी अद्याप अनेक कारखानदारांनी दिलेली नाही. तरीही ते गप्प आहेत. पैसे न देणाऱ्या कारखानदारांच्या मांडीला मांडी लाऊन ते बसत आहेत, असा घणाघात रघुनाथ पाटील यांनी पत्रकार बैठकीत बोलताना खा. शेट्टी यांच्यावर केला. 

तसचे ते पुढे म्हणाले, भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सर्वजण एकच आहेत. त्यामुळेच दोन महिने झाले कारखानदारांनी ऊस बिले दिली नाहीत तरीही हे सर्वजण गप्प आहेत. काही शेतकरी नेत्यांना खासदार केले, आमदार केले म्हणजे शेतकरी चळवळ मोडीत काढली गेली असे होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी  खा. शेट्टी यांच्या संगनमतानेच एफआरपीचे तुकडे केले. त्यांना शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यायचे नाहीत. थकीत एफआरपीसाठी आता आम्ही न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.