Mon, Jul 13, 2020 12:29होमपेज › Sangli › बनावट सोने देऊन फायनान्स कंपनीचा फसवणुकीचा प्रयत्न

बनावट सोने देऊन फायनान्स कंपनीचा फसवणुकीचा प्रयत्न

Published On: Jun 08 2019 2:00AM | Last Updated: Jun 08 2019 2:00AM
मिरज : प्रतिनिधी

शिवाजी रस्त्यावरील इंडो इन्फोसिस फायनान्स कंपनीला दोन लाखांच्या कर्जासाठी 9 तोळ्यांच्या बनावट सोन्याच्या बांगड्या देऊन फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुडची (जि. बेळगाव) येथील दोघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी मन्सूर ओमाने यास अटक करण्यात आली आहे. 

दोन लाख रुपये कर्ज मागणीसाठी 9 तोळे सोन्याच्या बांगड्या खलील अहमद संदरवाले याच्यामार्फत मन्सूर ओमाने हा घेऊन आला होता. कंपनीने सोन्याची तपासणी केली असता त्या सोन्याच्या बांगड्या बनावट असल्याचे निदर्शनास आले. बनावट सोने देऊन कर्ज मागणार्‍या खलील संदेलवाले व मन्सूर ओमाने या दोघांविरुद्ध फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापक  स्मिता माने यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक बी. एल. माळी तपास करीत आहेत.