Mon, Jul 06, 2020 22:33होमपेज › Sangli › भीतीमुळेच राष्ट्रवादीबद्दल चुकीचा प्रचार 

भीतीमुळेच राष्ट्रवादीबद्दल चुकीचा प्रचार 

Published On: Apr 09 2019 1:59AM | Last Updated: Apr 08 2019 10:50PM
आष्टा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील भाजप विरोधातील सर्व राजकीय पक्ष व नेत्यांची मोट बांधून सत्तांतर घडविण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.त्याची भिती वाटत असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याबद्दल व राष्ट्रवादी काँगेस पक्षाबद्दल गैरसमज पसरवित आहेत, अशी टीका राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

येथे काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभीमानी शेतकरी संघटना आघाडीचे  उमेदवार खासदार राजू शेट्टी  यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . नगराध्यक्षा स्नेहा माळी ,उपनगराध्यक्षा संगीता सुूर्यवंशी , माजी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे , सुभाष शेट्टी  उपस्थित होते.

पाटील म्हणाले, मोदी यांनी वर्धा येथील सभेत  पवार यांच्यावर टीका केली.राष्ट्रवादीच्या नेत्यांना तिहार जेलमध्ये टाकण्याची भिती दाखवून राष्ट्रवादीबद्दल गैरसमज पसरवित आहेत. भाजप -  सेना युतीचे सरकार जाती - जातीत फूट पाडून त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहे.या सरकारकडून सहकार मोडीत काढण्याचे काम सुरू असून जनसामान्यांच्या हिताविरूध्द निर्णय घेतले जात आहेत.त्यामुळे या सरकारविरूध्द देशभर असंतोष आहे.

माजी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे म्हणाल्या , खासदार  शेट्टी यांनी शेतकर्‍यांच्या ऊस व दुधाला दर मिळवून दिला आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांची त्यांना साथ आहे.त्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित आहे. प्रकाश रूकडे , विशाल शिंदे,झुंझारराव पाटील ,  संभाजी कचरे, विराज शिंदे, श्रीकांत कबाडे, रमेश हाके, दिनकर पाटील ,दिलीप वग्यारी ,रघुनाधराव जाधव ,  संग्राम फडतरे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.