Mon, Sep 16, 2019 11:50होमपेज › Sangli › मतदानाच्या शर्यतीत ‘दिव्यांग’ सर्वात पुढे

मतदानाच्या शर्यतीत ‘दिव्यांग’ सर्वात पुढे

Published On: Apr 25 2019 1:45AM | Last Updated: Apr 24 2019 11:11PM
सांगली : प्रतिनिधी

लोकसभा मतदानाच्या शर्यतीत दिव्यांग मतदानाचा टक्का सर्वात पुढे राहिला आहे. जिल्ह्यात 13 हजार 981 दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. हे प्रमाण 81.16 टक्के आहे. ग्रामीण भागात दिव्यांगांचे मतदान 80.31 टक्के, तर शहरी भागात (सर्व नगरपालिका, महापालिका) 86.70 टक्के झाले आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदार जागृती अभियानचे प्रमुख अभिजीत राऊत म्हणाले, दिव्यांग मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले होते. दिव्यांग मतदारांची नोंदणी, दिव्यांग मतदार जागृतीवर भर दिला होता. घर ते मतदान केंद्र आणि मतदान केंद्र ते घरापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली होती. मतदान केंद्रावर व्हीलचेअर, सहायक अशी व्यवस्थाही तैनात होती. दिव्यांग मतदारांनीही प्रशासनाच्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद दिला. 

तासगाव सर्वाधिक; जत सर्वातकमी

जिल्ह्यात एकूण 17 हजार 227 दिव्यांग मतदार आहेत. त्यापैकी 13 हजार 981 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण 81.16 टक्के आहे.  जिल्ह्यात ग्रामीण भागात 14 हजार 903 दिव्यांग मतदार आहेत. त्यापैकी  11 हजार 968 मतदारांनी मतदानाचा  हक्क बजावला. ग्रामीण भागात दिव्यांगांचे सर्वाधिक 87.59 टक्के मतदान तासगाव तालुक्यात झाले. सर्वात कमी 61.46 टक्के मतदान जत तालुक्यात झाले. 

सर्व नगरपालिकांमध्ये 1 हजार 26 दिव्यांग मतदार असून 951 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण 92.43 टक्के आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात 1298 पैकी 1051 मतदान झाले. हे प्रमाण 80.97 टक्के आहे.  

तालुका             दिव्यांगांचे झालेले मतदान         
  
कडेगाव                 517  (83.25 टक्के)  

आटपाडी                876  (85.46 टक्के)       

पलूस                    1015 (87.19 टक्के) 

शिराळा                  1256 (87.40 टक्के) 

जत                       1595 (61.46 टक्के)  

खानापूर                  922 (78.80 टक्के)     

वाळवा                   2123 (81.91 टक्के)       

तासगाव                1469 (87.59 टक्के)          

क.महांकाळ            1078 (87.50 टक्के)       

मिरज                    1117 (80.35 टक्के)       

महापालिका :          1051 (80.97 टक्के)  

एकूण शहरी:           2013 (86.70 टक्के)  

सर्व नगरपालिका:    951 (92.43 टक्के)       

एकूण ग्रामीण:        11968 (80.31 टक्के)