Sat, Dec 07, 2019 10:03होमपेज › Sangli › ढालगावच्या दोघांना सांगलीत अटक

ढालगावच्या दोघांना सांगलीत अटक

Published On: Aug 24 2019 1:29AM | Last Updated: Aug 23 2019 11:14PM
सांगली : प्रतिनिधी

ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी येथे अटक केली. त्यांच्याकडून मिरज व विश्रामबाग येथील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीतील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

कादीर अस्लम मणेर (वय 23) व असीफ अमीन मुजावर (19, दोघे रा. ढालगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे पथक विश्रामबाग येथे शंभरफुटी रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी संशयित तिथे चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेल्या दोन दुचाकींच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली; त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. गेल्या काही महिन्यांपासून ते दुचाकींची विक्री करण्यासाठी ग्राहकांच्या शोधात होते.  संशयितांनी या दुचाकी गतवर्षी विश्रामबाग व मिरज येथून  चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी विश्रागबाग व महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल होते. ते पहिल्यांदाच रेकॉर्डवर आले आहेत.

प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश

गेल्या काही महिन्यांत शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडले आहेत. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत.