Thu, Jul 02, 2020 10:45होमपेज › Sangli › स्वाभिमानी खासदार कारखानदारांच्या वळचणीला : धैर्यशील माने 

स्वाभिमानी खासदार कारखानदारांच्या वळचणीला : धैर्यशील माने 

Published On: Apr 21 2019 1:42AM | Last Updated: Apr 20 2019 11:05PM
बोरगाव : वार्ताहर

शेतकर्‍यांच्या जीवावर सत्ता मिळवलेले खासदार पुन्हा सत्तेसाठी कारखानदारांच्या वळचणीला गेले. हे कसले स्वाभिमानी! छातीवर बिल्ला लावून कोणी स्वाभिमानी होत नाही. स्वाभिमान हा रक्‍तात असावा लागतो, असे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी केले.

बोरगाव (ता. वाळवा) येथे  सभेत माने  बोलत होते. राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विक्रम पाटील, राहुल महाडिक, भास्कर कदम, सरपंच जयंती पाटील, उपसरपंच आशिष शिंदे उपस्थित होते. खोत म्हणाले, मोदी सरकारने शेतकरी हितासाठी साखर इथेनॉलच्या किंमतीत वाढ करून ऊस उत्पादकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. 

माजी उपसरपंच प्रमोद  शिंदे  म्हणाले, महायुती  सरकारच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी मिळाला आहे. यावेळी राहुल महाडिक, विकास देशमुख यांची भाषणे झाली.  सूर्यकांत पाटील, शकील मुल्ला, सुनीता फार्णे, विद्या फार्णे,  प्रसाद पाटील, अभिजित पाटील  आदी उपस्थित होते.