Tue, Jul 14, 2020 03:19होमपेज › Sangli › अनैतिक संबंधाच्या सशंयावरुन वडिलांनीच केला मुलीचा खून

अनैतिक संबंधाच्या सशंयावरुन वडिलांनीच केला मुलीचा खून

Published On: Oct 03 2018 7:37PM | Last Updated: Oct 03 2018 7:37PMजत (सांगली)  : प्रतिनिधी

जत तालुक्यातील खिलारवाडी येथे अनैतिक संबंधाच्या सशंयावरुन वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुप्रिया सुर्याबा लोखंडे (वय-२१) असे या मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी जत पोलिसांनी मुलीचे वडील सुर्याबा ऊर्फ सुरेश लोखंडे यास ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुप्रिया लोखंडे हिचे आपल्याच भावकीतील चुलत पुतण्या जगन्नाथ बाळासो लोखंडे यांच्याशी अनैतिक संबंध असलेच्या संशयावरुन तसेच सतत मोबाईल वर बोलत असल्याच्या कारणावरून जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलीचा गळात दाबून डोक्यात दगड घालत काल, मंगळवार (दि.२ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास खून केला. याबाबतची फिर्याद जगन्नाथ लोखंडे यांनी जत पोलिसात दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मुलीचे वडील सुर्याबा ऊर्फ सुरेश लोखंडे यांस ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.