Wed, Oct 24, 2018 01:32होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबचा उद्या अंकलीत होम मिनिस्टर 

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबचा उद्या अंकलीत होम मिनिस्टर 

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 8:59PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ मधील कस्तुरी क्‍लबच्यावतीने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आदिनाथ दिगंबर जैन मंदिराजवळ, अंकली येथे घेण्यात येणार आहे.  या कार्यक्रमामध्ये टोमॅटो एफएमवरील बाबुराव महिलांशी संवाद साधणार आहेत.  उद्या (दि. 9) दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रम महिलांसाठी खुला आहे. तसेच कार्यक्रम स्थळी कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी सुरू राहणार आहे.

दै. ‘पुढारी’ मधील कस्तुरी क्‍लबच्या ‘घर की गुरू’ या कार्यक्रमास  सांगलीवाडी व म्हैसाळ येथे भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘कस्तुरी क्‍लब’ महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम घेणार आहे. यावेळी टोमॅटो एफएमवरील बाबुराव विविध खेळ घेणार असून विजेत्या ठरलेल्या चार भाग्यवान ‘होम मिनिस्टर’ ला ‘दडगे बंधू’ यांच्याकडून डिझायनर साड्या, व्हीएलसीसी यांच्याकडून पाच महिलांना 500 रुपयांचे सर्व्हिस कुपन तसेच ‘महालक्ष्मी आटा चक्की’ यांच्याकडून पहिल्यांदा कस्तुरी सभासद होणार्‍या 25 कस्तुरी सभासदांना डिस्काऊंट कूपन यावेळी देण्यात येणार आहेत. 

कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये असून सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. तसेच कस्तुरींना वर्षभर तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत. दि सोलर शॉप 15%, शिवशंभो आटाचक्की 20%, सन फ्लेम एनर्जी सिस्टम 5 ते 25 %, दडगे बंधू 40 %, इलिक्झर (स्पोकन इंग्लिश क्‍लासेस) 50%, हॉटेल द ग्रेट सिझन 15%, कॉन्टाकेअर आय हॉस्पिटल 10 ते 30 %, फेमिनाईन ज्वेलर्स 10 ते 20 %, लाईफ फोर्स फिटनेस जिम 50%, नॅचरलस ब्युटी सलून 20%, भविष्यवेध 10 ते 20%, सागर एजन्सी 10 ते 15 %.

कार्यक्रमाच्या माहितीसाठी संपर्क : सौ. गीतांजली उपाध्ये, मो. 9823901008, सौ. संजीवनी पाटील मो. 9422315495. अधिक माहितीसाठी संपर्क पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, सांगली-मिरज रोड, सांगली, सौ. गीतांजली पाटील मो. 8805007176.