Thu, Nov 14, 2019 07:45होमपेज › Sangli › दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे सांगली, मिरज, तासगावमध्ये मेकअप अ‍ॅण्ड हेअर स्टाईल वर्कशॉप

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे सांगली, मिरज, तासगावमध्ये मेकअप अ‍ॅण्ड हेअर स्टाईल वर्कशॉप

Published On: Jul 11 2019 1:20AM | Last Updated: Jul 10 2019 11:00PM
सांगली  : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे  सांगली व मिरज मधील महिलांसाठी मेकअप अ‍ॅण्ड हेअर स्टाईल वर्कशॉप आयोजित केले आहे. सांगलीमध्ये दि. 14 जुलै (रविवार) रोजी राजपूत शैक्षणिक संकुल व्हाईट हाऊस येथे दुपारी 3 ते  5 या वेळेत  हे वर्कशॉप होणार आहे. 

मिरजेमध्ये दि. 16 जुलैै (मंगळवार) रंगशारदा हॉल, किल्ला भाग, मिरज येथे दुपारी 2 ते 4 या वेळेत हे वर्कशॉप होणार आहे. तासगावमध्ये दि. 20 जुलै (शनिवारी) स्व. आर. आर. पाटील बहुउद्देशीय हॉल तासगाव न्यायालयासमोर तासगाव दुपारी 3 ते 4 या वेळेत हे वर्कशॉप आयोजित केले आहे. प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे हा मोह असतो. एखाद्या कार्यक्रमाला जाताना तिला स्वत:ला आवरायला वेळ नसतो. घरातल्या  जबाबदार्‍या व मुलांचे आवरताना स्वतःसाठी  वेळ नसतो. त्यासाठी कमीत कमी वेळेत सुंदर कसे दिसता यावे यासाठी हा अनोखा वर्कशॉप आयोजित केला आहे. 

या वर्कशॉपमध्ये  आनंदस् प्रोफेशनल फॅमिली सलून अ‍ॅण्ड अ‍ॅकॅडमीच्या संचालिका किशोरी साळुंखे या प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. वर्कशॉपमध्ये मेकअपचे तीन प्रकार व हेअर स्टाईलचे तीन प्रकार शिकवण्यात येणार आहेत.मेकअपमध्ये डे - मेकअप, नाईट - मेकअप, पार्टी - मेकअप असे प्रकार शिकवण्यात येणार आहेत. हेअरस्टाईलचेही वेगवेगळे प्रकार शिकवण्यात येणार 
आहेत. 

या वर्कशॉपसाठी कस्तुरी सभासदांना 

मोफत व इतर महिलांसाठी 50 रुपये फी ठेवण्यात आलेली  आहे. या वर्कशॉपसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. अधिक महितीसाठी संपर्क : तनीम : 9325477714, दाईंगडे (तासगाव) 9325290230