Sat, Sep 21, 2019 07:08होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी महिलांनी सहलीचा लुटला आनंद

दै. पुढारी कस्तुरी महिलांनी सहलीचा लुटला आनंद

Published On: Jun 13 2019 1:28AM | Last Updated: Jun 12 2019 8:29PM
इस्लामपूर : प्रतिनिधी

निसर्गाच्या सान्निध्यात असणार्‍या सातारा तालुक्यातील बोरगाव येथील आनंद कृषी वनात दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या महिलांनी दिवसभर आनंद लुटला. दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने  महिलांसाठी एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले. यासाठी व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक यांनी सहलीसाठी बस देऊन मोलाचे सहकार्य केले. महाडिक कुटुंबीयांचा सामाजिक कार्यात कायमच सहभाग असतो. 

कस्तुरी सभासद महिलांनी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आनंद कृषी पर्यटन केंद्राचा येथेच्छ लाभ घेतला. महिलांनी घोडागाडी, बैलगाडीची अफलातून सफर, रेन डान्स, झुलता पूल, बोटिंग, किल्ले पर्यटनाची सफर करीत लहान मुलांसोबत पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला.  तसेच राशी उद्यान, लहान मुलांसाठी ग्रह, तारे, अंतराळ जगताच्या माहितीसाठी खगोल विश्‍व, प्ले पार्किंग, रायफल शूटिंग आणि पशु-पक्ष्यांची ओळख अशा असंख्य गोष्टींची महिलांनी ओळख करून घेतली. 

सकाळी चहा, नाष्टा तसेच दुपारी शाकाहारी भोजनाचाही आस्वाद घेतला. सकाळी जाताना बसमध्ये गाण्यांच्या तालावर महिलांनी डान्स केला. मौजमजा करत जाताना व येताना महिलांनी उखाणे घेतले. तसेच फनी गेम्स घेण्यात आल्या. 

विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली.  दै. ‘पुढारी’चे कस्तुरी क्लब हे महिलांचे व्यासपीठ आहे. महिलांसाठी वर्षभर वेगळे कार्यक्रम राबविले जातात. महिलांनी कस्तुरीच्या सर्वच कार्यक्रमांचे कौतुक केले.  महिलांसाठी असे उपक्रम घेणे  स्तुत्य असल्याच्या प्रतिक्रिया  व्यक्त केल्या.