Mon, Sep 16, 2019 12:19होमपेज › Sangli › सांगली, हातकणंगलेच्या निकालाची उत्कंठा

सांगली, हातकणंगलेच्या निकालाची उत्कंठा

Published On: May 21 2019 1:50AM | Last Updated: May 20 2019 9:22PM
सांगली : प्रतिनिधी

सांगली व हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या निकालाबाबत कमालीची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. एक्झिट पोलमुळे तर्क-विर्तकांना उधाण आले आहे. सोशल  मीडियात उमेदवारांच्या समर्थकांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उमेदवारांचीही धाकधाकू वाढली आहे. 

रविवारी विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले. यात अनेक ठिकाणी अनअपेक्षित, धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी जोरदार चुरस असल्याने कोण जिंकणार याबाबत स्पष्ट सांगितले नाही. सांगली व हातकणंगले मतदारसंघाबाबत स्पष्ट अंदाज वर्तविण्यात आलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाबाबत ‘सस्पेन्स’ आणखीन वाढला आहे. येथे कोण बाजी मारणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. सांगलीत स्वाभिमानीचे विशाल पाटील व भाजपचे संजय पाटील यांच्या जोरदार लढत असल्याचे बोलले जात आहे. गोपीचंद पडळकर यांचीही हवा  आहे.  तसेच हातगणंगलेमधून पहिल्या टप्प्यात खासदार राजू शेट्टी यांचे जड असणारे पारडे अंतिम टप्प्यात काहीसे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडे झुकल्याचा दावा केला जात आहे.  यामुळे उमेदवारांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे.  कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण किती लीड घेईल, याची आकडेवारी कार्यकर्ते तयार करीत आहेत. सर्वच गटांच्या पदाधिकार्‍यांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. काहीजणांच्यात वादावादी होत आहे. सर्वांनाच गुरुवारची उत्सुकता आहे. 

तुमचा अंदाज काय?

सांगली व हातगणंगलेबाबत भेटणारे प्रत्येकजण एकमेकाला ‘तुमचा अंदाज काय, असे विचारत आहे. पण कोणाला काही अंदाज येत नाही, अशी स्थिती  आहे. प्रत्येकजण अंदाजपंचे अंदाज सांगत आहेत.