Tue, Jul 07, 2020 22:26होमपेज › Sangli › सांगलीत पुन्हा संजय पाटलांचाच गुलाल

सांगलीत पुन्हा संजय पाटलांचाच गुलाल

Published On: May 23 2019 8:23AM | Last Updated: May 23 2019 6:55PM
सांगली : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीत देशाचा कौल भाजपच्या बाजूने दिसत असतानाच सांगलीतील जनतेने विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या त्रिशंकू लढतीत सुरुवातीपासूनच संजय पाटील यांनी आघाडी घेतली. मात्र पुढे काही फेऱ्यात लढत अटीतटीची दिसली. संजय पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून गोपिचंद पडळकर यांचे आव्हान होते.  

दरम्यान, सांगलीचा खासदार ठरविण्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभेच्या २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या संजय पाटील यांनी काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्‍ला २ लाख ३९ हजार मताधिक्क्याने काबीज केला होता. आता पुन्हा एकदा ते विजयाच्या जवळ आहेत. 

मतदारसंघ : सांगली ,  तेरावी फेरी
संजयकाका पाटील(भाजप)-414168
विशाल पाटील(स्वाभीमानी शेतकरी संघटना)-284538
गोपीचंद पडळकर- वंचित बहुजन आघाडी-234026 संजयकाका 129630 आघाडी

बाराव्या फेरीत स्वाभिमानी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे विशाल पाटील यांना सर्वाधिक 26 हजार 416 मते मिळाली तर भाजपचे संजय पाटील यांना 25 हजार दहा पडळकर 18407 मते मिळाली या फेरीत विशाल पाटील यांना 1406 मताची आघाडी मिळाली.

बाराव्या फेरीअखेर संजय पाटील 1लाख 11 हजार मतांनी आघाडीवर आहे त्यामुळे ही आघाडी विशाल पाटील कितपत तोडतील याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागलेली आहे.

मतदारसंघ : सांगली, बारावी फेरी
संजयकाका पाटील(भाजप)-390675
विशाल पाटील(स्वाभीमानी शेतकरी संघटना)-270199
गोपीचंद पडळकर- वंचित बहुजन आघाडी-211601 संजयकाका 120476आघाडी
मिरजेत भाजप कार्यकत्यांनी जल्लोष केला
.

मतदारसंघ : सांगली
संजयकाका पाटील(भाजप)-317454
विशाल पाटील(स्वाभीमानी शेतकरी संघटना)-214392

गोपीचंद पडळकर- वंचित बहुजन आघाडी-173419 संजयकाका 103062आघाडी

मतदारसंघ : सांगली
संजयकाका पाटील(भाजप)-309742
विशाल पाटील(स्वाभीमानी शेतकरी संघटना)-211438
गोपीचंद पडळकर- वंचित बहुजन आघाडी-162994 संजयकाका 98304 आघाडी

संजयकाका पाटील(भाजप)-291860
विशाल पाटील(स्वाभीमानी शेतकरी संघटना)-200564
गोपीचंद पडळकर- वंचित बहुजन आघाडी-155824 संजयकाका 91296 आघाडी

सांगलीत भाजप व संजय पाटील यांच्या  विजयाचा जल्लोष करताना सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, दिनकर पाटील, भारती दिगडे आदी.. 

सांगली लोकसभा भाजपा संजय काका पाटील 29 हजार  848 मतांनी आघाडीवर.

स्वाभिमानीचे विशाल पाटील दुसऱ्या स्थानावर

संजय काका पाटील - 88,271

स्वाभिमानीचे विशाल पाटील - 58,423

गोपीचंद पडळकर - 48,575
 

मतदारसंघ : सांगली
फेरी : तिसरी
संजयकाका पाटील(भाजप)-82318
विशाल पाटील(स्वाभीमानी शेतकरी संघटना)-54520
गोपीचंद पडळकर- वंचित बहुजन आघाडी-45502           
 संजयकाका 27798 आघाडी


पहिली फेरी पूर्ण : 
खासदार संजय पाटील 32152
गोपीचंद पडळकर 20401
विशाल पाटील 22409

सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजय पाटील पाच हजार मतांनी आघाडीवर
 संजय काका पाटील यांना 16400 बारामती दुसऱ्या क्रमांकावर गोपीचंद पडळकर 11200 90 मते तर विशाल पाटील यांना 10 हजार 738 मते
 विशाल पाटील दुसऱ्या क्रमांकावर संजय पाटील यांना एकवीस हजार 138 विशाल पाटील यांना 18 335 पडळकर 12 889
विशाल पाटील दुसऱ्या क्रमांकावर संजय पाटील यांना एकवीस हजार 138 विशाल पाटील यांना 18 335 पडळकर 12 889

सांगलीत पोस्टल मतमोजनीत  विशाल पाटील 1200 मतांनी आघाडीवर

सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल पाटील मतमोजणी केंद्रावर उपस्‍थित

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी पावणेनऊपर्यंत अद्यापही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही.