Sat, Jul 04, 2020 17:06होमपेज › Sangli › तासगाव : पेड गावात मुंबईवरून आलेल्या तरूणाला कोरोना

तासगाव : पेड गावात मुंबईवरून आलेल्या तरूणाला कोरोना

Last Updated: Jun 07 2020 8:33AM

संग्रहित छायाचित्रसांगली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाला आळा घालण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन चांगली भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे कोरोनाचा सांगलीतील वाढणारा आलेखावर नियंत्रण मिळत आहे. असे असताना देखील येथे नविन कोरोना बाधित सापडत आहेत. तासगाव तालुक्यातील कचरेवाडीनंतर पेड गावामध्ये कोरोना बाधित सापडल्यामुळे गावात खळबळ माजली असून जिल्हा पुन्हा हादरला. 

कोरोनाच्या भीतीने वृद्धाची आत्महत्या

पेड गावात २७ मे रोजी मुंबई वरून आलेल्या तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने गावातील लोकांची तारंबळ उडाली. तर याची माहिती मिळताच तालुका आरोग्य प्रशासनाने गावाला भेट देत मध्यरात्रीच गावचे रस्ते सील केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल सूर्यवंशी यांनी दिली.

लॉक ‘डाऊन’ महागाई अप

हा तरुण मुंबई मधून २७ मे ला एकटाच आला होता. गावात येताच त्याला संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. तर आरोग्य विभाग ही आपली योग्य भुमिका पार पाडत आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटर सॅनिटायझ केले आहे.