Mon, Sep 16, 2019 12:12



होमपेज › Sangli › स्वच्छ सर्वेक्षणात पश्चिम भारतात विटा शहर प्रथम 

स्वच्छ सर्वेक्षणात पश्चिम भारतात विटा शहर प्रथम 

Published On: Mar 06 2019 5:47PM | Last Updated: Mar 06 2019 5:47PM




विटा : वार्ताहर

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये विटा नगरपरिषदेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पश्चिम भारतात ५ राज्यांमध्ये २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका गटात विटा नगरपरिषदेने पहिला क्रमांक मिळवला. तसेच स्वच्छ शहराच्या क्रमवारी मध्ये सर्वसाधारण नगरपालिका गटात भारतामध्ये विटा शहराने चौथ्या क्रमांक पटकावला  आहे.

आज, बुधवार दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप एस पुरी यांच्या हस्ते व सेक्रेटरी नगरविकास केंद्र सरकार दुर्गा शंकर मिश्रा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील,  मुख्याधिकारी महेश रोकडे, आरोग्य सभापती अँड विजय जाधव यांनी स्विकारला.

घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, हगणदारीमुक्त शहर, प्लास्टिकमुक्त, कचराकुंडीमुक्त, वराहमुक्त, झोपडपट्टी मुक्त शहर तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुशोभिकरण, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत, बायोचार, यासोबतच शहरामध्ये नित्य साफसफाई, जनजागृतीसाठी अनेक उपक्रम पालिकेने हाती घेत केलेल्या परिश्रमाचे आणि यामध्ये विटेकर नागरिकांनी घेतलेला हा उत्फूर्त सहभाग यामुळेच हे यश मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. हा सन्मान सर्व विटेकर नागरिकांचा आहे असे प्रतिपादन अँड वैभव पाटील यांनी केले.