Wed, Jul 24, 2019 14:44होमपेज › Sangli › चांदोलीत भूकंपाचे सलग तीन धक्के ; नागरिक भयभित

चांदोलीत भूकंपाचे तीन धक्के; नागरिक भयभित

Published On: Jun 20 2019 12:34PM | Last Updated: Jun 20 2019 12:34PM
वारणावती : प्रतिनिधी

चांदोली परिसर आज सकाळी भूकंपाच्या तीन धक्क्यांनी हादरला. सलग तीन धक्के बसल्यामुळे नागरिक भयभित झाले होते. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे घरातील भांडी पडली. तसेच भूकंपाचा धक्‍का जाणवताच लोक घराबाहेर पळाले. 

आज गुरुवार सकाळी 7 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का चांदोली परिसरात बसला. वारणावती भूकंप मापन केंद्रावर त्याची तीव्रता 3.5 रिस्टर स्केल नोंदली गेली. हा धक्का थांबतो न थांबतो तोच लगेच दोन मिनिटांच्या फरकाने 7 वाजून 47 मिनिटांचे सुमारास पुन्हा याहून मोठा 3.8 रिश्टर स्केलचा धक्का बसला. हे दोनी धक्के सलग जाणवल्यामुळे नागरिक भयभित होऊन घराबाहेर पडले. या दोन्ही धक्क्यांबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू असतानाच पुन्हा 8 वाजून 27 मिनिटांच्या सुमारास पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला. वारणावती भूकंपमापन केंद्रावर याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदली आहे. या वर्षात सलग तीन धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या धक्क्यामुळे कोठेही जीवित वा वित्तहानी झाली नसून धरण सुरक्षित आहे. असा निर्वाळा वारणा प्रकल्पाचे शाखा अभियंता प्रदीप कदम यांनी दिला आहे.