Sat, Dec 14, 2019 11:05होमपेज › Sangli › पेठमध्ये घरफोडी : दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

पेठमध्ये घरफोडी : दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

Published On: Mar 22 2019 1:53AM | Last Updated: Mar 21 2019 11:36PM
इस्लामपूर : शहर वार्ताहर

वाळवा तालुक्यातील पेठ येथील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोने, 7 हजार रुपयांची रोकड, पितळ-तांब्याची भांडी असा एकूण 1 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. 

याप्रकरणी सुजाता दिनकर काटे (वय 65, रा. भीमनगर, पेठ) यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली. काटे या दि. 9 मार्च रोजी मुंबई येथील नातेवाइकांकडे गेल्या होत्या. दि. 19 रोजी शेजारी राहणारे शशिकांत मधाळे यांनी काटे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती त्यांना फोनवरून दिली. बुधवारी सुजाता या घरी आल्या. घराच्या  दरवाजाचे कुलूप तोडलेले  दिसले. कपाटातील 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे चार तोळ्यांचे गंठण, 30 हजार किमतीची अंगठी आदी वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या.