Wed, Jul 15, 2020 16:48होमपेज › Sangli › फरारी बबलू पठाण याला अटक

फरारी बबलू पठाण याला अटक

Published On: Jun 20 2019 2:00AM | Last Updated: Jun 20 2019 12:19AM
मिरज : प्रतिनिधी
सावकारी जाचास कंटाळून पोलिस ठाण्यात विषारी द्रव प्राशन करून मोहसीन बागवान याने आत्महत्या केली होती. याप्रकरणी बुधवारी जाकीर उर्फ बबूल पठाण यास शहर पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली होती. त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.माजी नगरसेवक साजिद पठाण व जाकीर उर्फ बबलू पठाण यांच्याकडून मोहसीन बागवान याला कर्जवसुलीसाठी वारंवार मारहाण होत असे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्याचे समजताच पुन्हा पठाण यांच्याकडून बागवान याला मारहाण करण्यात आली होती.  

सततच्या मारहाणीस वैतागलेल्या मोहसीनने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने शहर पोलिस ठाणे आवारात मोहसीनने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला.

याप्रकरणी  फरारी संशयित  साजिद पठाण हा मंगळवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याचा फरारी  भाऊ  जाकीर उर्फ बबलू पठाण हा बुधवारी सकाळी शहर पोलिसात हजर झाला. दोघांनाही शहर पोलिसांनी अटक केली. बागवान याला सावकारी कर्ज वसुलीच्या प्रकरणातून  सतत मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.