Tue, Jul 14, 2020 01:18होमपेज › Sangli › महापालिकेत भाजप अपयशी; विकासकामे ठप्प

महापालिकेत भाजप अपयशी; विकासकामे ठप्प

Published On: Jun 26 2019 1:40AM | Last Updated: Jun 25 2019 11:41PM
सांगली : प्रतिनिधी

महापालिकेत विकासकामांच्या वचननाम्यानुसार भाजपला जनतेने संधी दिली. पण अकरा महिने उलटूनही भाजप कारभार चालविण्यास  अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.  अकरा महिन्यात गैरकारभार, दबावासाठी आयुक्‍तांसह अधिकार्‍यांच्या बदल्याचे उद्योग सुरू असल्याचे ते म्हणाले. सत्तधार्‍यांच्य या कारभाराविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधक आवाज उठवणार असल्याच ते म्हणाले .

महापालिकेत भूलथापा देऊन सत्ता काबिज केली. त्यासाठी पारदर्शी कारभाराचा गवगव केला होता. जनतेनेही मोठ्या अपेक्षेने भाजपाला स्पष्ट बहुमत देत सत्तेची सूत्रे हाती दिली. सत्ता हाती घेतल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीमार्फत सत्तेवर अंकुश ठेवू. नागरिकांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करू, असे आश्‍वासन दिले. पण अकरा महिन्यात  शहरात एकही विकाकाम झाले नाही. उलट तीनही शहराचा दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांत रस्ते, ड्रेनेज योजना बंद पडली आहे. शेरीनाला योजना मार्गी लावण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर आमच्या सत्ताकाळात सांगली, कुपवाडसाठी सुरू केलेली पाणी योजनाही अनागोंदी कारभाराने विस्कळीत केली आहे. 

पाटील म्हणाले, नगरोत्थान योजनेंतर्गत महापालिकेला दिलेला 100 कोटींचा निधी भाजपने विकासनिधी म्हणून तुणतुणे वाजविले. त्याचे वर्षभरात नियोजन झाले नाही. त्यामुळे अद्याप अद्याप एक रुपयांचेहीकाम झालेले नाही. 

विधानसभेसाठी शब्द

पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जोरावर मी तयारी केली. त्यावेळी स्वाभिमानीला जागा सोडल्याने पक्षश्रेष्ठींनी थांबायला सांगितले. मात्र त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीतून सांगलीतून मला उमेदवारीचा शब्द दिला आहे.  

आमदारांचा कंट्रोल नाही...२४ तासात बदली

पाटील म्हणाले, महापालिकेत भाजपच्या कारभारी आणि नगरसेवकांवर कोअर कमिटीचे कसलेच नियंत्रण राहिले नाही. केंद्र, राज्य आणि महापालिकेतही एकहाती सत्ता असूनही भाजपला विकासकामे करता येईनात. वास्तविक दोन्ही शहराच्या आमदारांवर विश्‍वास ठेवून जनतेने भाजपला संधी दिली होती. पण आज त्यांचाही कारभार्‍यांवर कंट्रोल नाही. त्यांचेही कारभारी ऐकत नाहीत. भाजपने वर्षाभरात काही केले नाही. मात्र सोयीस्कररित्या कारभार्‍यांसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन 24 तासात आयुक्‍तांची बदली मात्र करून दाखविली.