Fri, Sep 20, 2019 22:07होमपेज › Sangli › आरग येथे महिलेवर अत्याचार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

आरग येथे महिलेवर अत्याचार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Oct 18 2018 1:23AM | Last Updated: Oct 18 2018 12:46AMमिरज : शहर प्रतिनिधी

मिरज तालुक्यातील आरग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर विश्‍वनाथ धोंडे (वय 60) याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना आरग (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात   दि. 13 रोजी घडली. याबाबत पीडित महिलेने बुधवारी रात्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करण्यासाठी बेडग येथील ग्रामस्थ पोलिस ठाण्यात आले होते. पीडित महिला तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली होती. त्यावेळी तिच्यावर  डॉ. धोंडे याने अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेने दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टर विश्‍वनाथ धोंडे याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.