Mon, Dec 17, 2018 04:05होमपेज › Sangli › तासगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

तासगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Published On: Oct 12 2018 1:02AM | Last Updated: Oct 12 2018 1:02AMतासगाव : प्रतिनिधी

अपुर्‍या व अनियमित पावसामुळे तासगाव तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामाची शाश्वती नाही. पिण्याचे पाणी आणि चार्‍याची टंचाई  आहे.  त्यामुळे तालुक्यात तातडीने दुष्काळ  जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. गुरुवारी पक्षाने शहरात मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीपक वजाळे यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे : आरफळ, ताकारी, टेंभू कालव्यामधून  तालुक्यातील सर्व तलाव तातडीने भरून घ्यावेत. पेट्रोल व डिझेल वर महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारने आकारलेले कर रद्द करावेत. तेलाच्या किंमती सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा ठेवाव्यात. गॅसच्या किंमती प्रति सिलेंडर 400 पर्यंत मर्यादित ठेवाव्यात. शेती पंप व घरगुती वापराच्या विजेची अन्यायकारक दरवाढ रद्द करावी. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा. शासनाने प्रमाणित केलेल्या दर्जाप्रमाणे दुधाला दर मिळावा.