Thu, Jul 02, 2020 12:16होमपेज › Sangli › मिरजेत एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न 

मिरजेत एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न 

Published On: Nov 10 2018 1:14AM | Last Updated: Nov 10 2018 12:00AMमिरज : प्रतिनिधी

येथील गांधी चौकात एका दारू दुकानात दारू पिण्यासाठी आलेल्या तानाजी रामचंद्र दंडुगुले (वय 25, रा. समतानगर, मिरज) याला लुटण्याच्या उद्देशाने अडवून, मारहाण करून त्याच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये जय शंकर नेमाडे (वय 34, रा. मंगळवार पेठ), निखिल युवराज कांबळे (25, रा. कमानवेस, मंगळवार पेठ), दीपक ऊर्फ अमोल मारुती शिंदे (32, रा. पंढरपूर रोड, अष्टविनायक नगर), वीरेंद्र ऊर्फ पिंटू बाबासाहेब देसाई (42, रा. मंगळरवार पेठ), राहुल राजेंद्र भोरे (31, रा. कमानवेस) आणि सनी नामदेव नाईक (34, रा. कुंकुवाले गल्ली, मंगळवार पेठ, मिरज) यांचा समावेश आहे. जखमी तानाजी दंडुगुले याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गांधी चौकातील एका दारू दुकानात दारू पिण्यासाठी तानाजी   आला होता. यावेळी  तिथे आलेल्या वरील सहा जणांनी त्याच्या खिशातील रोख अडीच हजार रुपये आणि एक मोबाईल काढून घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी विरोध करणार्‍या दंडुगुडे याच्यावर  एकाने गाडीतून पेट्रोल काढून त्याच्या अंगावर ओतले. काढी ओढून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दंडुगुले हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. आगीमध्ये त्याचा शर्ट जळाला असून तो जखमी झाला आहे.

या घटनेनंतर शहर पोलिसात जय उर्फ जयड्या नेमाडे, निखील कांबळे, दिपक उर्फ अमोल मारुती शिंदे, विरेंद्र देसाई, राहुल भोरे, सनी नाईक यांच्या विरुद्ध जबरदस्तीने पैसे काढून घेतले. शिवीगाळ, दमदाटी केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सहा जणांना न्यायालयात हजर केले. त्यांना 10 दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक एच.ए.तांबोळी  तपास करीत आहेत. अटक करण्यात आलेल्या काही जणांवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.