Mon, Dec 16, 2019 08:26



होमपेज › Sangli › अवैध गौणखनिजवर कारवाई 

अवैध गौणखनिजवर कारवाई 

Published On: Sep 23 2019 1:57AM | Last Updated: Sep 23 2019 12:56AM




कडेगाव : शहर प्रतिनीधी
कडेगाव तालुक्याच्या नूतन तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी अवैध गौणखनिज उत्खनन करणार्‍या तस्करांवर कारवाई केली. येवलेवाडी येथे अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक करीत असताना जेसीबी, तीन ट्रॅक्टरसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला. ही कारवाई शनिवार रात्री करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, येवलेवाडी  हद्दीत मुरुमाचे अनाधिकृतपणे उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार डॉ. पाटील यांना मिळाली. त्यांनी मंडल अधिकारी व तलाठ्यांना तत्काळ आदेश देऊन मुरुमाचे अनधिकृतपणे उत्खनन व वाहतूक करणारे  विना क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर  व जेसीबीसह 2 ब्रास मुरूम असा एकूण सुमारे चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला. 

कडेगाव तालुक्यातील येरळा व नांदणी नदीची वाळू पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या नद्यातून ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी व यारी आदीच्या सहाय्याने वाळू तस्करी होते. याचबरोबर सोनहिरा ओढा, महादेव ओढा व निमसोड ओढ्यातून रात्री वाळूची चोरी होत असते. येरळा नदीतील वाळू उपशाला उच्च न्यायालयाची बंदी आहे. हा आदेश मोडीत काढून वडियेरायबाग, वांगी, शिवणी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू चोरली जाते.