Mon, Dec 09, 2019 05:42होमपेज › Sangli › एटीएममध्ये भरण्यास दिलेल्या 4 लाख 45 हजारांचा अपहार

एटीएममध्ये भरण्यास दिलेल्या 4 लाख 45 हजारांचा अपहार

Published On: Jul 21 2019 1:26AM | Last Updated: Jul 21 2019 1:26AM
कासेगाव : प्रतिनिधी 

कासेगाव ( ता. वाळवा ) येथील युनियन बँकेच्या एटीएममध्ये रकमेचा भरणा करणार्‍या दोन कर्मचार्‍यांनी वेळोवेळी बँकेने दिलेली पूर्ण रक्‍कम न भरता सुमारे 4 लाख 45 हजार 700 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गणेश दगडू हारूगडे (रा. चांदोली वसाहत, नवे चावरे, ता. हातकणंगले), राहुल चंद्रकांत लोहार ( रा . वारणानगर) यांच्यावर कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

कंपनीचे अमित अशोक सावंत (रा . कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, वरील दोघांनी कट करून संगनमताने हा प्रकार केला आहे. 

कंपनीमार्फत युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या कासेगाव येथील एटीएममध्ये रकमेचा  भरणा  करण्याची सेवा दिली जाते. एटीएममध्ये भरणा करण्यासाठी बँकेकडून त्यांना विश्वासाने दिलेल्या रकमेपैकी 4 लाख 45 हजार 700 रुपये इतक्या रकमेचा अपहार केला आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.