Tue, Jul 14, 2020 03:21होमपेज › Sangli › कुमठे फाट्याजवळ पावणेतीन लाख जप्त

कुमठे फाट्याजवळ पावणेतीन लाख जप्त

Published On: Mar 27 2019 1:57AM | Last Updated: Mar 27 2019 12:04AM
तासगाव : शहर प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाहणी सुरू असताना कुमठे फाटा (ता. तासगाव) येथे  मंगळवारी स्कॉर्पिओ गाडीतून पावणेतीन लाख रुपये जप्त केल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली. जिल्ह्यात ही पहिलीच कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. खरात म्हणाले, आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्ह्यामध्ये सर्वत्र वाहन तपासणी सुरू आहे. शस्त्रे, रोख रकमेची वाहतूक आणि दारूसाठा अशी वाहतूक होत असल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता वाहन तपासणी सुरू होती. स्थिर पथकाचे प्रमुख सुभाष सोनवले यांना एन. अकबर (वय 45, रा. दावणगिरी, कर्नाटक) यांच्या स्कॉर्पिओ (के.ए. 03 एम.एफ. 6762) गाडीमध्ये  दोन लाख 76 हजार रुपये आढळले. याबाबत त्यांनी त्वरित प्रांताधिकारी डॉ.  खरात यांना ही माहिती दिली. खरात यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ही रक्कम आणि वाहन ताब्यात घेतले आहे. जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पथकामार्फत या रकमेची चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.