होमपेज › Sangli › ‘कस्तुरी क्‍लब’तर्फे आज पलूस येथे खेळ पैठणीचा

‘कस्तुरी क्‍लब’तर्फे आज पलूस येथे खेळ पैठणीचा

Published On: Sep 21 2019 1:34AM | Last Updated: Sep 20 2019 11:15PM
सांगली : प्रतिनिधी

दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. यामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमाबरोबरच विविध प्रशिक्षणे दिली जातात. त्यातीलच एक भाग म्हणून ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन पलूस येथील संग्राम लॉन येथे आज शनिवारी (दि. 21) रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे.

या खेळामध्ये  विजेत्या महिलेला हर्षल कलेक्शन यांच्याकडून मानाची पैठणी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून हर्बल न्युट्रीशन, संग्राम उद्योग समूह, स्वाद मसाले, राजनंदिनी ब्युटीक, रॉयल जीम आणि तनिष्क ब्युटी पार्लर यांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार्‍या सर्व सभासदांना स्वाद मसाला यांच्याकडून मसाले देण्यात येणार आहेत. तसेच लकी ड्रॉमधून होमकर साडी सेंटर यांच्याकडून पाच पैठणी व अक्षता ज्वेलर्स यांच्याकडून पाच नथी देण्यात येणार आहे. 

संपर्क : मंगल देसावळे 8830604322, नीता सूर्यवंशी (पलूस) 9766627232, वर्षा माने (पलूस) 9422311255, प्रनौती पवार 7447448596, मनीषा लोखंडे (किर्लोस्करवाडी) 7775810206.

सभासद नोंदणी...पुढारी कस्तुरी क्‍लबची सभासद नोंदणी कार्यक्रमस्थळी सुरू राहणार असून सभासद फी रुपये 500 आहे. सभासद झाल्यानंतर हमखास गिफ्ट म्हणून सूर्या कंपनीची 1499 रुपयांची सिंगल बर्नर शेगडी मोफत मिळणार आहे.