Mon, Jun 17, 2019 10:26होमपेज › Sangli › वाहून गेलेल्या डॉ. राहुल यांचा मृतदेह सापडला

वाहून गेलेल्या डॉ. राहुल यांचा मृतदेह सापडला

Published On: Apr 15 2019 6:29PM | Last Updated: Apr 15 2019 6:29PM

वारणावती : वार्ताहर 

चांदोली धरणाच्या पाण्यातून शनिवारी वाहून गेलले डॉ. राहुल मगदूम ( वय 35 ) यांचा आज सोमवारी तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला .गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक नागरिक तसेच सांगलीचे जीवन रक्षक दलाचे जवान डॉक्टर राहुल मगदूम यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांना यश आले नव्हते. आज कोल्हापूरच्या जीवन आधार रेस्कू फोर्सचे जवानांनी सकाळपासून शोध मोहीम राबवली .दुपारी दोनच्या दरम्यान त्यांना राहुल यांचा मृतदेह उखळू पुलाजवळ तरंगताना आढळून आला. 

वाचा : चांदोलीत वाहून गेलेल्या डॉक्टरांचा शोध सुरूच

शनिवारी डॉक्टर राहुल पर्यटनासाठी चांदोरीला आले होते. जेवण झाल्यानंतर ते वारणा नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले .पाण्यातील भोवऱ्यात अडकल्यामुळे तसेच पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते वाहून गेले. दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.