Sat, Jul 11, 2020 14:43होमपेज › Sangli › गटबाजीतील भाजपला सत्ता संघर्षाचे ‘ग्रहण’

गटबाजीतील भाजपला सत्ता संघर्षाचे ‘ग्रहण’

Published On: Apr 04 2019 2:02AM | Last Updated: Apr 03 2019 8:54PM
सांगली : अमृत चौगुले

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपला लोकसभा निवडणूक काळात तरी काही धोका होणार नाही, पण विधानसभा निवडणुकीपूर्वीच पदाधिकारी निवडीतून सत्तासंघर्ष उफाळून येण्याचा धोका आहे. यामध्ये स्थायी समितीत काठावर असलेल्या (9-7) सदस्यसंख्येतून सभापती निवडीलाच धोक्याची घंटा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यातून खेळ करणार, हे उघड आहे. त्यामुळे प्रसंगी यातून सत्तापालटाचीही शक्यता नाकारता येत नाही. 

महापालिकेत महाआघाडीचा कार्यकाळ वगळता तसे पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता होती. परंतु गेल्या 2014 पासून भाजपने केंद्र, राज्यासह जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींत सत्ता काबिज केली होती. अगदी 2018 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने फोडाफोडी आणि इनकमिंगच्या आधारे शेवटचे सत्ताकेंद्रही काबिज केले. अर्थात हे थोपविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊनही अपयशी ठरले होते. त्यानुसार भाजपने 78 पैकी 41 जागा, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने 35 जागा पटकावल्या होत्या. स्वाभिमानीतून माजी उपमहापौर विजय घाडगे व गजानन मगदूम अपक्ष निवडून आले होते. परंतु मगदूम यांनी तत्काळ तर घाडगे यांनी गेल्या महिन्यात भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. यामुळे आता भाजपचे संख्याबळ 43 वर झाले आहे. त्यामुळे सध्या भाजपसाठी फिलगूड वातावरण आहे. 

मात्र गेल्या सहा महिन्यात भाजपला महापालिकेत कामकाजात काही सूर लागलेला नाही. सत्तेचे बक्षीस म्हणून जाहीर झालेल्या नगरोत्थान योजनेंतर्गत 100 कोटी रुपयांच्या विकासकामे मंजुरीतच गाडी अडकली आहे. दुसरीकडे या कामांसह विविध कारणांनी भाजपमध्ये आता गटबाजी दिसू लागली आहे. एकमेकांना विश्‍वासात घेत नसल्याचा सूर पुढे येत आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी महासभा, स्थायी सभेसह प्रभाग समित्यांच्या सभांमध्ये सत्ताधारी भाजपला धारेवर धरत आहे. परिणामी अनेक विषयांवर तोंडघशी पडण्याची वेळ भाजपवर येत आहे. 

आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी 35 नगरसेवकांची फौज महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी उतरणार आहे. काँग्रेसपेक्षा काही नेत्यांच्याबाबतीत  अंतर्गत मतभेद आणि कुरघोड्यांचा नगरसेवकांना मोठा अनुभव आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी मोठी दुखावली आहे. परंतु नेते राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील 

पुन्हा बंडाचे संकेत

विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांचा कामाचा धडाका पाहता त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपकडून उमेदवारी निश्‍चित मानली जाते. परंतु माजी आमदार दिनकर पाटील यांनीही गेल्या जानेवारी महिन्यातील वाढदिवसाच्या कार्यक्रमात बंडखोर स्वभावाचा दाखला देत आगामी वेगळ्या वाटचालीचे संकेत दिले होते. शिवाय त्यांनी पुत्र अजिंक्य  यांच्या सभापती निवडीपासूनच छत्रपती शासक ‘बॅनर’चा वापर सुरू केला आहे. वाढदिवसाच्या निमित्तानेही छत्रपती शासकच संयोजक होते. त्यामुळे विधानसभेला बंडखोरी किंवा लोकसभेच्या निर्णयानंतर त्यांनी वेगळी वाट पकडल्यास भाजपला अडचणीचे ठरू शकते.

सत्तासंघर्षाची टिपरी झडणार..

सत्तासंघर्षाची सुरुवात सप्टेंबरमध्ये नव्याने स्थायी समिती सभापती निवडीवेळी होणार आहे. सध्या स्थायीत भाजपचे 9 तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे 7 सदस्य आहेत. आता नेते दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्य पाटील सभापतीपदावरून पायउतार झाल्यानंतर नव्याने संधीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये मिरजेतच भाजपचे शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने, पांडुरंग कोरे आणि  सांगलीतूनही अनेक दावेदार आहेत. त्यापैकी एकाला जरी संधी मिळाली नाही तर साहजिकच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने ‘डाव पलटी’ करण्याच्या खेळी रंगणार आहेत. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही खुली ऑफर दिली जाणार आहे. हे थोपविणे भाजप नेत्यांना अडचणीचे ठरणार आहे. तेथून अन्य समित्या सभापती निवडीतही खेळी रंगणार आहेत. 

पक्षनिहाय सदस्य संख्या 

 भाजप  43 = 41 + 2 (स्वाभिमानी 1+अपक्ष 1) स्वीकृत - 3
 काँग्रेस -राष्ट्रवादी  35 = 20 + 15 (स्वीकृत 2, प्रत्येकी एक)
 एकूण : 78 + 5 स्वीकृत = 83