Sun, Apr 21, 2019 06:10होमपेज › Pune › ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन

Published On: Nov 09 2018 9:16AM | Last Updated: Nov 09 2018 6:53PMपुणे : पुढारी ऑनलाईन

नाट्यसृष्टीमध्ये अजरामर भूमिका करून वेगळा ठसा उमटवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे आज पुण्यात निधन झाले. त्या ७९ वर्षाच्या होत्या. त्यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाल्याची भावना कलाकारांमधून व्यक्त होत आहे.

कमला, सखाराम बाईंडर, गिधाडे आदी नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’ आणि ‘कमला’. लालन सारंग यांच्या आयुष्यातील ही तीन महत्वाची नाटके ठरली. त्यातील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या होत्या. त्याचबरोबर जगण्याचं नवं भान देणाऱ्याही ठरल्या.  

लालन सारंग यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ७  ते ७.३0 या वेळात बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे ठेवण्यात येईल तर अंत्यविधी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी, मुंबई येथे होतील.