Sun, Apr 21, 2019 05:51होमपेज › Pune › विजेचा धक्का लागून संपुर्ण कुटुंबाचा बळी 

विजेचा धक्का लागून संपुर्ण कुटुंबाचा बळी 

Published On: Nov 09 2018 7:50PM | Last Updated: Nov 10 2018 1:14AM पुणे : प्रतिनिधी    

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कशेळे परिसरातील वजांरवाडी येथील पेज नदीत तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तींची ओळख पटली आहे. सीताराम काटे, हिराबाई काटे आणि मुलगी सारिका काटे अशी मृतांची नावे आहेत.

मृतांमध्ये काटे कुटुंबातील आई, वडील आणि मुलगी अशा तिघांचा समावेश आहे. विजेच्या खांबावरुन अनधिकृतपणे आकडा टाकून विद्युत प्रवाह असलेली तार पाण्यात सोडून मासेमारी सुरु असताना आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेमध्ये अगोदर वडिलांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवायला पत्नी गेली तिलाही विजेचा धक्‍का बसला. आई-वडिलांना शॉक लागला हे पाहून मुलगी नदीपात्रात गेली आणि विजेच्या धक्क्याने तिचाही मृत्यू झाला.

कर्जत येथील कशेळे दूरक्षेत्रमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा त्वरित बंद करुन तिघांचे मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या  घटनेमुळे नागरीकां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.