Mon, Aug 19, 2019 19:32होमपेज › Pune › साहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत

साहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत

Published On: Jan 18 2019 4:45PM | Last Updated: Jan 18 2019 4:46PM
पुणे : प्रतिनिधी

साहित्यिक आपल्या समाजाच्या जडण-घडणीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांनी आपल्या लेखणीतून नेहमीच समाजातील वंचित घटकांचे दुःख जगासमोर आणले. या प्रतिभावंत साहित्यिकाच्या हलाखीच्या परिस्थितीच्या वृत्ताची शासनाने दखल घेऊन, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना तातडीने 5 लाख रुपयांची मदत मंजूर केली. 

गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मदतीचा धनादेश त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेऊन सुपूर्द केला. यावेळी डॉ. पाटील यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली. प्रतिभावंत साहित्यिक, कलाकार यांच्या पाठीशी शासन नेहमीच उभे राहील असे आश्वासन यावेळी त्‍यांनी दिले.