Mon, Jun 17, 2019 11:16होमपेज › Pune › ...अन शिक्षण संचालनालयात दिल्या दारूच्या बाटल्या (Video)

...अन शिक्षण संचालनालयात दिल्या दारूच्या बाटल्या (Video)

Published On: Oct 12 2018 11:25AM | Last Updated: Oct 12 2018 11:33AMपुणे : प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराजाबद्दल एका पुस्तकात अवमानकारक शब्द वापरल्यामुळे संभाजी ब्रिगेडने चक्क शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात दारूच्या बाटल्या देत निषेध व्यक्त केला आहे. तर वीर भगतसिंग विद्यार्थी सेनेच्यावतीने अधिकार्यांना फैलावर घेतले. दोन दिवसांत शिक्षण विभागाने वितरित केलेल्या पुस्तकांच्या प्रति माघारी घेतल्या नाही तर अधिकाऱ्यांना दारूने अंघोळ घालण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. 

छत्रपती संभाजी महाराज महाराजाबद्दल अवमानकार शब्‍द वापरलेले पुस्तक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात निषेध केला जात आहे. पुण्यात गुरुवारी संभाजी ब्रिगेडने शिक्षण संचालनालय कार्यालयात दारुच्या बाटल्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवत निषेध व्यक्त केला. 

शालेय विभागाच्यावतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खोट्या इतिहासाची आणि महाराजांबद्दल द्वेष निर्माण होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने वाटप केलेल्या पुस्तकांची तातडीने विल्हेवाट लावावी, संभाजी महाराजांच्या अवमानकारक लेखनाबद्दल लेखिकेने माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. 

दोन दिवसांत शिक्षण विभागाने निर्णय न घेतल्यास अधिकाऱ्यांना दारूने अंघोळ घालण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. आंदोलनात संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, विर भगतसिंग संघटनेच्या पुजा झोळे, प्रशांत धुमाळ, चंद्रकांत घाडगे, मंदार बहिरट यांनी सहभाग घेतला होता. एकंदरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानकारक लिखानबद्दल वातावरण तापले आहे.