Wed, Jun 19, 2019 08:32होमपेज › Pune ›  जाहिरात कंपनीच्या मालकाला अटक

 जाहिरात कंपनीच्या मालकाला अटक

Published On: Oct 12 2018 1:29AM | Last Updated: Oct 12 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी 

शाहिर अमर शेख चौकात होर्डिंग काढण्याचे काम सुरू असताना कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी कॅप्शन अ‍ॅडव्हर्टाझिंग कंपनीचे मालक अब्दुल रज्जाक महम्मद खालीद फकिह (54, रा. अर्जुन मनसुखानी पथ, कोरेगाव रस्ता) यांना अटक केली आहे. याप्रकरणात यापुर्वी रेल्वे अभियंता संजयसिंग विष्णुदेव (42, रा. विकासनगर, देहूरोड) आणि त्याच्या सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे (57, रा.कसबा पेठ) यांन 6 ऑक्टोंबर रोजी अटक करण्यात आली होती.तिघांचीही न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कोसळलेले होर्डिंग अनधिकृत असून, ते धोकादायक असल्याचे पुणे महापालिकेच्या आकशचिन्ह विभागाने रेल्वे प्रशासनाला 2013 पासून वेळोवळी पत्र पाठवून कळवले होते. मात्र रेल्वेकडून त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. होर्डिंग खुपच कमकूवत झाल्यावर रेल्वे प्रशासनाने ते पाडण्याचे काम हाती घेतले होते. होर्डिंग गॅस कटरच्या सहाय्याने खालच्या बाजूने कापत असताना ते सिग्नलवर थांबलेल्या सहा रिक्षा, एक कार व दोन दुचाकींवर पडले. धक्कादायक बाब म्हणजे होर्डिंग इतरत्र पडू नये म्हणून कोणतीही ठोस काळजी घेण्यात आली नव्हती. यासंदर्भात घटनेच्या दिवशी रात्री उशीरा रेल्वे प्रशासन व ठेकेदाराविरुध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर विष्णुदेवसिंग आणि वनारे यांना अटक करण्यात आली होती. 

होर्डींगच्या परवान्याची मुदत संपल्याने कोसळलेल्या होर्डिंगसह परिसरातील इतर तीन होर्डिंग काढण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांना 13 डिसेंबर 2017 रोजी पत्र दिले होते. पण रेल्वेकडून त्यांना परवानगी देण्यात आली नाही. ठेकदारामार्फत हे होर्डिंग काढले जाईल, असे रेल्वेकडून जाहीरात कंपनीला सांगण्यात आले होते. बंडगार्डन पोलिसांनी कंपनीचे मालक अब्दुल रज्जाक महम्मद खालीद फकिह यांनी अटक करत न्यायालयात हजर केले. त्यावेळी संबंधीत गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा व अजामीन पात्र असून, सत्र न्यायालयात चालणारा आहे. तसेच अटक आरोपींकडून फरार आरोपींची माहिती व ठावठिकाणा काढावयाचा आहे. 

गॅस कटर व मशिन जप्त करावयाचे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिल एम. एम. काळवीट यांनी केली होती. मात्र प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी टी. एम. निराळे यांनी तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.  ठेकेदार मल्लिकार्जुन व त्याच्या कामगारांचा शोध सुरू आहे.