Thu, May 23, 2019 10:39
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पिंपरी :मंदिरात आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पिंपरी :मंदिरात आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Published On: Jun 13 2018 4:40PM | Last Updated: Jun 13 2018 4:41PMपिंपरी : प्रतिनिधी

मंदिरात खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. ही घटना  शनिवारी (दि.९) रोजी घडली. याबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती. आज आरोपीला न्यायालयात हजर केल्यामुळे ही घटना उघड झाली. पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. 

पिंपरी खराळवाडी येथील एका मंदिरात हा प्रकार घडला. या प्रकरणी रोहन भांडेकर (वय १८, रा. खराळवाडी) याला पिंपरी पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. त्यास १८ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ वर्षाची पीडित मुलगी शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास खराळवाडी येथील मंदिरात खेळत होती. आरोपीने तिला मंदिरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिस स्‍टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.  पुढील तपास सहाय्‍यक पोलिस निरीक्षक गजानन कडाळे करत आहेत.