Sat, Apr 20, 2019 16:22होमपेज › Pune › राज ठाकरेंवरील प्रेमामुळे महापौर जाधव अडचणीत 

राज ठाकरेंवरील प्रेमामुळे महापौर जाधव अडचणीत 

Published On: Aug 11 2018 1:15PM | Last Updated: Aug 11 2018 1:15PMपिंपरी : प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भाजपवर कडाडून टीका करत असताना, पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या महापौरांचं राज ठाकरेंवरील प्रेम दिसून आले. एका कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव चक्क राज ठाकरेंसमोर नतमस्तक झाले.मात्र राज यांनी मंडल अहवालावरून केलेल्या वक्तव्याचा आधार घेत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापौरांच्या कृतीस आक्षेप घेतला आहे त्यामुळे महापौर अडचणीत आले आहेत

राज ठाकरे पिंपरी चिंचवडमध्ये एका खाजगी जिमचं उद्घाटन करण्यासाठी शुक्रवारी  रहटणीत आले होते. त्यावेळी महापौर राहुल जाधव यांनी राज ठाकरेंपुढे लोटांगण घेत त्यांचा आशिर्वाद घेतला.

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हा राहुल जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश करुन राजकारणात एन्ट्री केली होती. मनसेच्या तिकिटावर ते २०१२ साली पिंपरी महापालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच निवडून आले होते.

२०१७ साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यंदा त्यांना महापौर होण्याचा मान मिळाला. महापौरपदाच्या निवडणुकीतही मनसेच्या एकमेव नगरसेवकाने जाधव यांनाच मत दिले होते. त्यामुळे जाधव यांच्या मनात मनसेविषयी अजूनही प्रेम असल्याचं या निमित्ताने दिसून आले होते. मात्र सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापौरांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.

दिवंगत माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोग लागु करुन सकल ओ.बी.सी.समाज्याला न्याय दिला. यासाठी पंतप्रधान पदावर पाणी सोडले. त्या व्ही.पी सिंग याच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ वक्तव्य राज ठाकरे यानी नुकतेच केले होते. ते काल पिपरी चिचवडला आले होते त्या वेळी महापौर निवडणूकिच्या दिवशी महात्मा फुले चा वेष परिधान करून आलेले महापौर  राहुल जाधव राज ठाकरेंच्या चरणी लीन होतात.आत्ता पाहुया ओ.बी.सी.महासंघ व बारा बलुतेदार महासंघ काय भमिका घेतो? अशी टिपण्णी  भापकर यांनी केली आहे